पिंपरी चिंचवड

पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे विजयी

पिंपरी, (भारत अस्मिता ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना १,०९,२३९ इतकी मतं मिळाली आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांना ७२,५७५ इतकी मतं मिळाली आहेत. त्यांनी ३६,६६४ मतांचं मताधिक्क्य मिळवत शीलवंत यांचा निवडणुकीत पराभव केला आहे.

एकूण वीस फेऱ्या झाल्या. सुरवातीपासून बनसोडे त्यांनी मतांची आघाडी राखली होती. त्यामुळे त्यांचा विजय पक्का झाला. त्यांच्या विजयामुळे पिंपरीतील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

पिंपरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे तर, प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत हे दोघे होते. त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोज गरबडे यांना ७१७३ इतकी मत मिळाली असून नोटाला ४०१३ इतकी मत मिळाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button