आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने लॉन्च केले “आकाश इन्विक्टस” – JEE तयारीसाठी अंतिम गेम-चेंजर

• उत्कृष्ट दर्जाचे अभ्यास साहित्य
• संपूर्ण भारतात ४०+ शहरांमध्ये ५०० हून अधिक अनुभवी JEE प्राध्यापक, ज्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना IIT प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
• अत्याधुनिक तंत्रज्ञान व AI समर्थित प्लॅटफॉर्म, जो वैयक्तिकृत आणि सुधारित शिक्षण अनुभव प्रदान करतो.
• आकाशच्या उच्च दर्जाच्या प्रक्रियांसह आणि प्रणालींसह समर्थित, ज्यामुळे २५ केंद्रांवर दर्जेदार आणि सातत्यपूर्ण शिक्षणाची हमी दिली जाते.
• अधिक माहितीसाठी, पालक आणि विद्यार्थी ७३०३७५९४९४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा support.invictus@aesl.in वर ईमेल करू शकतात.
पुणे, २१ मार्च २०२५: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), भारतातील अग्रेसर टेस्ट प्रिपरेटरी संस्था, अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोत्तम आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी “आकाश इन्विक्टस” हा नाविन्यपूर्ण आणि उच्चस्तरीय JEE तयारी प्रोग्राम लॉन्च करत आहे. IIT किंवा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा AI-समर्थित, वैयक्तिकृत, उच्च-तीव्रतेचा आणि निकाल-केंद्रित उपक्रम आहे.
आकाश इन्विक्टस अंतर्गत ५०० हून अधिक JEE तज्ज्ञ शिक्षक एकत्र येणार आहेत, ज्यांचा IIT मार्गदर्शनात सिद्धहस्त अनुभव आहे. सर्वोच्च IIT रँक मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आधुनिक आणि नीटनेटका पद्धतीने तयार करण्यात आला आहे. हा प्रोग्राम फिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब करतो, जिथे AI-सक्षम आणि अडॅप्टिव्ह लर्निंगचा उपयोग करून विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेच्या सर्वोत्तम तयारीसाठी विशेष अध्ययन संसाधने दिली जातील.
या कठोर अभ्यासक्रमात संपूर्ण पुनरावलोकन आणि चाचणी मॉड्यूल समाविष्ट आहे, जे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अंतिम टप्प्यात केंद्रित तयारी करण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासक्रम, शंका-निवारण सत्रे आणि उत्कृष्ट निकाल मिळवण्यासाठी संपूर्ण नियोजित टेस्ट सिरीजचा लाभ मिळेल. आकाश इन्विक्टस लहान बॅचेसमध्ये शिकवले जाईल, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष दिले जाऊ शकेल.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. दीपक मेहरोत्रा यांनी या कार्यक्रमाच्या महत्त्वावर भर देत सांगितले,
“आकाश इन्विक्टस हा केवळ एक कोचिंग प्रोग्राम नसून IITमध्ये सर्वोच्च रँक मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक परिवर्तनकारी प्रवास आहे. हा प्रोग्राम दशकांचा अनुभव असलेल्या नामांकित प्राध्यापकांना एकत्र आणतो, अत्याधुनिक अध्यापन पद्धतींचा समावेश करतो आणि AI तसेच तंत्रज्ञान-समर्थित वैयक्तिकृत शिक्षण प्रदान करतो. गेल्या काही वर्षांत, आमच्या शिक्षकांनी लाखो विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वीरित्या मार्गदर्शन केले आहे. अभ्याससामग्री पूर्णपणे सुधारित करण्यात आली असून, संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करून उद्योगातील काही सर्वोत्तम तज्ज्ञांनी ती विकसित केली आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की हे सर्वोत्तम आहे – जर तुम्ही त्यापेक्षा चांगले साहित्य तयार करू शकता, तर आम्ही तुम्हाला सन्मानित करू आणि आमच्या संघात सामील होण्यासाठी आमंत्रित करू.”
ते पुढे म्हणाले, “हा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला असून, आतापर्यंत 2500+ सर्वोत्तम विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तीन मुख्य आधारस्तंभांवर उभा असलेला – नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व अभ्याससाहित्य, तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रगत AI साधने – ‘आकाश इन्विक्टस’ JEE तयारीसाठी नवीन मानदंड निर्माण करेल. हे सर्व वैशिष्ट्ये आकाशच्या विश्वासार्हता, गुणवत्तेच्या वचनबद्धतेसह तांत्रिक कौशल्याने समर्थित आहेत.”
या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यास संसाधनांमध्ये करण्यात आलेले नाविन्यपूर्ण बदल. विद्यार्थ्यांना अध्यायनिहाय सराव कार्यपत्रिका दिल्या जातील, ज्यामध्ये QR कोड अंतर्भूत असतील, जे सविस्तर समाधान आणि टप्प्याटप्प्याने मार्किंग योजना प्रदान करतील. यामुळे त्यांची शालेय व बोर्ड परीक्षांसाठी तयारीही उत्कृष्ट होईल. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक ऑलिम्पियाड कार्यशाळा, जुन्या JEE प्रश्नसंचांचे सखोल विश्लेषणासह संग्रहण, तसेच ‘JEE चॅलेंजर’ संसाधन उपलब्ध असेल, जे त्यांचे धोरण अधिक परिष्कृत करण्यासाठी सखोल विश्लेषण, सराव प्रश्न आणि अंतर्दृष्टी प्रदान करेल. याशिवाय, हा कार्यक्रम फिजिटल (Physical + Digital) अभ्यास साहित्याचा समावेश करतो, जे भौतिक आणि डिजिटल संसाधनांचे मिश्रण करून जटिल संकल्पना सुलभ करते. तसेच, विद्यार्थी तज्ज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेल्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ व्याख्यानांमधून लवचिक आणि ऑन-डिमांड शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.
‘आकाश इन्विक्टस’ मध्ये प्रवेश अत्यंत निवडक पद्धतीने दिला जातो. केवळ सर्वोत्कृष्ट आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी खास प्रवेश चाचणी घेतली जाते. हा कार्यक्रम ११वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा आणि १०वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांचा आहे. हा कोर्स दिल्ली NCR, चंदीगड, लखनऊ, मेरठ, प्रयागराज, कानपूर, वाराणसी, जयपूर, कोटा, पटना, रांची, बोकारो, कोलकाता, दुर्गापूर, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, वडोदरा, इंदौर, भोपाळ, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, देहरादून आणि मदुराई यासारख्या ४०+ शहरांमध्ये उपलब्ध असेल.
हा कोर्स उच्च शैक्षणिक निकष व सतत बदलणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपाशी सुसंगत राहील, याची खात्री करण्यासाठी एक समर्पित संशोधन संघ या अभ्यासक्रमाची निर्मिती करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परिवर्तनात्मक शैक्षणिक अनुभव मिळेल.