महायुती समाजात दुफळी माजवण्याचे काम – सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख

पिंपरी, (भारत अस्मिता ) – वोट जिहादचे राजकारण करून महायुती समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत असून समस्त मुस्लिम बांधवांनी आता याला चोख उत्तर देण्याची गरज आहे व पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व लोकशाही सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम हिंदू बौद्ध ख्रिश्चन हे सर्व घटक एकोप्याने व एक दिलाने वास्तव्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात हेतू पुरस्कार काही घटना घडत आहेत. तरीही मुस्लिम समाजाने अतिशय शांततेने व सामाजिक ऐक्य राखण्याच्या दृष्टीने आपली भूमिका बजावली आहे.
महायुती आता मताचे राजकारणासाठी म्हणून विनाकारण सामाजिक दुफळी माजविण्याचे काम करत आहेत. आता महायुतीला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित, व सामाजिक एकोपा राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या सुलक्षणा शिलवंत यांना विजयी केले पाहिजे असे आवाहन इरफान शेख यांनी केले आहे.