पिंपरी चिंचवड
नागरिकांची भावना; ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ने निम्मे मैदान मारले

भोसरी, (भारत अस्मिता ) – मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा, शांतता, महिलांना सुरक्षा या मुद्द्यावर चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, राधाकृष्ण नगर तसेच चक्रपाणी वसाहतीतील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जास्तीत जास्त लीड देऊन विजयी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून , राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा एकच जयघोष पाहायला मिळत आहे
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राधाकृष्ण नगर, चक्रपाणि वसाहत, महादेव नगर तसेच लांडगे वस्ती परिसरामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यादरम्यान पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांशी संवाद साधत अजित गव्हाणे यांनी आगामी काळात नागरिकांना या परिसरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळेल असे सांगितले.
दरम्यान आजच्या पदयात्रेत नुकतेच भाजपमधून महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेल्या माजी नगरसेविका सारिका लांडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे यांनी देखील सहभाग घेतला. या भागातील दडपशाही मोडून काढण्यासाठी अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करणार आहे असे संतोष लांडगे म्हणाले. संतोष लांडगे यांनी अजित गव्हाणे यांच्यासोबत पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधला. आपले प्रश्न अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून सोडवले जातील..त्यामुळे अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन संतोष लांडगे यांनी नागरिकांना केले.
तरुणांचा स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभाग
आजच्या सभेत युवकांचा अजित गव्हाणे यांना प्रचंड पाठिंबा असल्याचे दिसून आले. अनेक तरुण स्वयं स्फूर्तीने अजित गव्हाणे यांच्यासोबत पदयात्रेत चालताना दिसत होते. यावेळी काही तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. तरुणांशी संवाद साधताना अजित गव्हाणे यांनी आगामी काळात आपल्या शहरातील औद्योगिक बेल्ट लक्षात घेऊन स्मॉल क्लस्टर उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मोशी येथील एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर पूर्णपणे कार्यान्वित व्हावे यासाठी पावले उचलली जातील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.