मदत वेल्फेअर ट्रस्ट पुणे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना पसायदान पुरस्कार व ज्येष्ठ साहित्यिकांसाठी प्रतिभा गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन उत्साहात संपन्न*
मदत वेल्फेअर ट्रस्ट पुणे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना पसायदान पुरस्कार व ज्येष्ठ साहित्यिकांसाठी प्रतिभा गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन उत्साहात संपन्न*
मदत वेल्फेअर ट्रस्ट पुणे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना पसायदान पुरस्कार व ज्येष्ठ साहित्यिकांसाठी प्रतिभा गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन उत्साहात संपन्न*
पुणे – वंचित निराधार अनाथ व नाकारले गेलेल्या समाजातील घटकांना स्वावलंबी व स्वयंनिर्भर बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या मदत वेल्फेअर ट्रस्ट तर्फे पुण्यातील पत्रकार भवन येथे सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणारा पसायदान पुरस्कार 2025,ज्येष्ठ साहित्यिकांना दिला जाणारा प्रतिभा गौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साठी मदत व निमंत्रितांचे कवी संमेलन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व कवी सौमित्र किशोर कदम, ज्येष्ठ मराठी गझलकार म भा चव्हाण, दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक जेष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे उपस्थित होते. यावेळी मंचावर मदत वेल्फेअर ट्रस्ट पुण्याच्या अध्यक्षा दिपाली वारुळे, नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त उमेश कोठीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिकेत सेवाभावी संस्था पुणे यांच्या संस्थापिका संचालिका कल्पना वर्पे यांना सन्मानचिन्ह मानपत्र व रुपये २५ हजार रोख अशा स्वरूपात पसायदान पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध लेखक व कवी बालाजी सुतार यांना सन्मान चिन्ह मानपत्र व रुपये दहा हजार रुपये रोख अशा स्वरूपात प्रतिभा गौरव पुरस्कार 2025 मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी ज्ञानदीप बालगृह दिघी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोख दहा हजार रुपये आर्थिक मदतीचा मदतीचा चेक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच निवारा वृद्धाश्रम पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांना रोख दहा हजार रुपयाची आर्थिक मदतीचा चेक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी निमंत्रित कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनामध्ये प्रसिद्ध कवी म भात चव्हाण बालाजी सुतार वैभव देशमुख शाम खामकर उमेश कोठीकर या कवींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ऋतुजा विघ्ने यांनी मानले मदत वेल्फेअर ट्रस्ट तर्फे अनाथ मुले मुली रस्त्यावर भीक मागणारी मुले मुली निराधार वेडसर मनोरुग्ण स्त्री पुरुष निराधार वृद्ध सेक्स वर्कर्स यांची मुले, तुरुंगातील कच्चे कैदी यांची मुले धुणी भांडी तसेच काम करणाऱ्या मोलकर्णीची मुले आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची व हलाखीची परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांची मुले विविध आदिवासी समाजाची शिक्षणापासून दूर असलेली मुले गरीब परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नसलेली मुले यांचे शिक्षण होईपर्यंत आर्थिक व सामाजिक पालकत्व घेणे हा मदत ट्रस्ट चा उद्देश आहे. तसेच ग्रामीण भागातील लोककला सादर करणारे दुर्लक्षित कलाकार, वृद्धाश्रम,नवोदित कवियत्री, ज्येष्ठ साहित्यिक त्यासाठी मदत वेल्फेअर ट्रस्ट काम करत असते.
या प्रसंगी मदत वेल्फेअर ट्रस्ट ला मदत करून या वंचित लोकांना जीवदान देऊन त्यांना समान संधी देण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा दीपाली वारुळे यांनी केले.