कला

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र  व अर्चना नेवरेकर फाउंडेशन, कलादर्पण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या बांगरवस्ती केसनंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा तसेच कलाकारांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांना मोफत उत्पन्नाच्या दाखलांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. ना. चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी  धीरज घाटे शहराध्यक्ष भाजपा, पुणे शहर, संदीप खर्डेकर प्रवक्ते भाजपा महाराष्ट्र प्रदेश, मेलडी मेकर्स चे अशोककुमार सराफ, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष  योगेश सुपेकर, कार्याध्यक्ष बबलू खेडकर आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष  योगेश सुपेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची घोषणा धीरज घाटे यांनी केली. कार्यक्रमास सचिव गणेश मोरे, उपसाचिव अश्विनी कुरपे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड

खजिनदार रशीद शेख, उपखजिनदार मनोज माझिरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सोमनाथ फाटके, पिं. चिं. शहर जिल्हा संपर्कप्रमुख अमीर शेख, अभय गोखले प्रवक्ता महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राजरत्न पवार  उपस्थित होते. अश्विनी कुरपे यांनी आभार मानले आणि निवेदन अभय गोखले यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button