सीलीने पुण्यात सुरु केली ‘सीली स्लीप गॅलरी’ लक्झरी मॅट्रेसच्या नवीन श्रेणीचे उद्घाटन

पुणे
जगप्रसिद्ध मॅट्रेस ब्रँड सीली इंडियाने पुण्यात ‘सीली स्लीप गॅलरी’ चे भव्य उद्घाटन केले. अजमेरा व्हेंचर्स यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेली ही गॅलरी ICC टेक पार्क (प्लॉट A), जे.डब्लू मॅरिअट शेजारी, ग्राउंड फ्लोअर येथे स्थित आहे. सुमारे १३०० चौरस फूट जागेवर उभारलेली ही गॅलरी पुण्यातील लक्झरी स्लीप अनुभवाची नवीन ओळख निर्माण करणार आहे.
गॅलरीचे उद्घाटन सीलीचे चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. जॉर्ज डायर, जनरल मॅनेजर श्री. जी. एस. एस जगन्नाथ, आर्किटेक्ट श्री. अजिंक्य धुमाळ आणि फ्रँचाईजी मालक श्री. राजकुमार व श्री. पदमकुमार कुमार अजमेरा यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटनप्रसंगी श्री. जॉर्ज डायर म्हणाले, “राजकुमार आणि पदमकुमार अजमेरा हे Sealy Posturepedic ब्रँडचे जुने आणि विश्वासू भागीदार आहेत. त्यांचे कौशल्य आणि निष्ठा यामुळे ही गॅलरी ग्राहकांना चांगली सेवा आणि उत्कृष्ट प्रॉडक्ट रेंज देईल.”
या गॅलरीमध्ये सीली Posturepedic च्या नवीनतम संग्रहांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेक्नॉलॉजीसोबत स्थानिक कारागिरीचा संगम येथे दिसतो. सीलीच्या Elevate, Elevate Ultra, PostureSense आणि Palatial Crest या विविध प्रकारच्या मॅट्रेसची रेंज येथे उपलब्ध आहे.
सीली मॅट्रेसची किंमत रुपये ५५,००० पासून सुरू होऊन ११ लाखांपर्यंत जाते. यामध्ये सीलीची खास IceTouch टेक्नॉलॉजी, ऑर्थोपेडिकली डिझाईन्ड सपोर्ट आणि प्रीमियम कम्फर्ट लेयर्सचा समावेश आहे.
सीली इंडिया ने सप्टेंबर २०२४ मध्ये हैदराबादमध्ये आपले पहिले उत्पादन केंद्र सुरु केले असून, तेथून भारतातील ग्राहकांसाठी स्थानिक गरजांनुसार उत्पादने तयार केली जात आहेत.
सीली इंडिया बद्दल:
१८८१ साली टेक्सासमधील सीली शहरात स्थापन झालेली सीली ही जगातील क्रमांक १ मॅट्रेस ब्रँड आहे. ऑर्थोपेडिक अॅडव्हायझर बोर्डसोबतच्या सहकार्याने सीलीने मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य अशी तंत्रज्ञानाधारित झोप प्रणाली विकसित केली आहे. २०१२ पासून सीली इंडिया ही Tempur Sealy International आणि Sealy Australia यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग आहे.