पिंपरी चिंचवड

युवाशक्तीच्या जोरावर, बदलाच्या मार्गावर! डॉ.सुलक्षणा शिलवंत यांची मोहन नगर मध्ये भव्य रॅली

 

मतांचा महोत्सव, रस्त्यावर जोश! भव्य प्रचार दौरा

पिंपरी, (भारत अस्मिता ) – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा कडून विधानसभा निवडणूक प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रामनगर येथे माजी उपमहापौर श्री. दिनकरराव दातीर पाटील यांची भेट घेऊन प्रचार दौऱ्याची सुरुवात केली.त्यांनतर पुढे रामनगर मंदिर, विद्यानगर गणेश मंदिर आणि श्री पावन अंबिका माता प्रतिष्ठान, पुढे दत्तवाडी परिसरातील नागरिकांना भेट देत संध्याकाळी शाहूनगर पर्यंत पोहोचलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.ज्यामध्ये पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान डॉ.सुलक्षणा शिलवंत यांनी जनतेशी संवाद साधला आणि आपल्या पक्षाच्या धोरणांची माहिती दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून आपण मला संधी द्या, मी या संधीचे सोने करेन असा विश्वास दिला.

संजोग वाघेरे पाटील,ॲड. गौतम चाबुकस्वार, संदीप चव्हाण,दत्ता मोरे, अरुण म्हात्रे, गणेश दातीर पाटील, सतीश भोसले,अविनाश दातीर पाटील, राम पात्रे, विठ्ठल कळसीत, दयानंद मोरे, सुजित रासकर, तात्यासाहेब धुमाळ पांडुरंग पाटील, शिवसेनेचे मेजर साळुंखे, शिवसेना विभाग प्रमुख गोपीचंद जगताप, आदींसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार दौऱ्यादरम्यान शाहूनगर येथे कार्यकर्ते आणि समर्थकांनी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करून उत्साहात स्वागत केले. यावेळी परिसरातील साई मंदिर,महालक्ष्मी मंदिर, महादेव मंदिर आणि गणेश वसंत बाळूमामा देवस्थान मंदिरात दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.

प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात अजंठा सोसायटी, निरुपम सोसायटी येथील नागरिकांची भेट घेतली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील समस्या अधोरेखित करून या सोडविण्यासाठी नागरिकांना एकजुटीने काम करूया असे आवाहन केले. यावेळी समवेत सोसायटीचे सचिव रविदास दास यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या रॅलीत पक्षाच्या झेंड्यांनी सजवलेल्या दुचाक्यांमुळे परिसर रंगीत झाला होता. या उपक्रमामुळे स्थानिक मतदारांशी थेट संवाद साधण्यास मदत झाली.

*आता परिवर्तन अटळ आहे*

रॅलीमध्ये शेकडो दुचाकी सहभागी झाल्या होत्या, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी च्या जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेत प्रचंड उत्साह दिसून आला. रस्त्यावर नागरिकांच्या घोषणांनी एकप्रकारची चैतन्यपूर्ण ऊर्जा निर्माण झाली होती. मतदार डॉ.सुलक्षणा यांच्यासाठी समर्थन दर्शवत होते, तसेच विविध मुद्द्यांवर चर्चा करत आपले हक्क आणि अपेक्षा व्यक्त करत होते.

डॉ.सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की,घोषणांचा जयघोष हा लोकशाहीत लोकांच्या सक्रिय सहभागाचे प्रतीक आहे. असे दृश्य समाजाच्या एकत्रित विचारांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती दर्शवते. निवडणुकीच्या काळात नागरिकांची ही ऊर्जा आणि सहभाग त्यांचे मताधिकाराची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो.आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम केल्यास आपल्या क्षेत्राचा विकास वेगाने होईल आणि आता परिवर्तन अटळ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button