धोकादायक इमारतीत चालणाऱ्या ऑर्किड शाळेवर महापालिका आयुक्तांकडून बंदी
धोकादायक इमारतीत चालणाऱ्या ऑर्किड शाळेवर महापालिका आयुक्तांकडून बंदी

धोकादायक इमारतीत चालणाऱ्या ऑर्किड शाळेवर महापालिका आयुक्तांकडून बंदी
भवानी पेठेतील जय हाउसिंग सोसायटीत भरवली जाणारी अनाधिकृत शाळा ऑर्किड स्कूलवर लवकरात लवकर पालाईककडून बुलडोजर चालवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
अनेक वेळा नोटीसा देऊनही ही शाळा कोणत्याही परवानगीशिवाय सोसायटीच्या आवारात अत्यंत धोकादायक अशा इमारतीत भरवल्या जात असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा चालक संचालक यांच्याकडून कोणतीही खबरदारी न घेता या परिसरात शाळा भरवली जाते.
या विरुद्ध जय हौसिंग सोसायटीतील सदस्य रहिवासी यांनी महापालिकेचा शिक्षण विभाग, बांधकाम विभाग यांच्याकडे शेकडो तक्रारी दिल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून धोकादायक इमारतीला पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांना शाळा चालकांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यात आले असून पालिकेचा आणि सीईओपी अशा दोन्ही अहवालात शाळा भरते ती इमारत धोकादायक असल्याचं निदर्शनात आले आहे.
यावर पुणे महानगरपालिकेने आता कंबर कसली असून शाळा सुरू होण्याआधी धोकादायक इमारतीवर कारवाई होणार असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले