नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५७ वा स्थापना दिन साजरा.

पुणे -पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५७ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सर दोराबजी टाटा असेंब्ली हॉलमध्ये विविध शैक्षणिक आणि औपचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि सनदी लेखापल डॉ. अनिल लांबा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेव्हिल वाडिया हॉल मधे कॉलेज चे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध सनदी लेखापल डॉ. अनिल लांबा यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात आर्थिक व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कोणत्याही संस्थेच्या किंवा कोणत्याही व्यवसायाच्या यशासाठी आणि शाश्वततेसाठी आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. आर्थिक व्यवस्थापन व्यवसायांना त्यांचे वित्त व्यवस्थित करण्यास, आवश्यक भांडवल मिळविण्यास आणि रोख प्रवाह प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करते”. लांबा यांनी लिहिलेल्या ‘रोमान्सिंग विथ बॅलन्स शीट’ या पुस्तकातील काही किस्से त्यांनी या वेळी कथन केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कॉलेजच्या बिझनेस मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अशोक चांडक (ट्रस्टी), प्रा. सचिन सानप (ट्रस्टी), डॉ. अनिता हमंद (ट्रस्टी), डॉ. गणेशन आर. (सीएफओ), प्रा. डॉ. वृषाली रणधीर (प्रभारी प्राचार्य), प्रा. डॉ. प्रकाश चौधरी (उपप्राचार्य), सीए. जयश्री वेंकटेश (उपप्राचार्य – स्वयं वित्त अभ्यासक्रम) सुश्री सोनिया अय्यंगार (उपप्राचार्य, ज्युनियर कॉलेज) या कार्यक्रमाला उपस्थित होते.