बॉलीवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या चित्रपट सृष्टीच्या 100 वर्षाच्या प्रवासाच्या स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
बॉलीवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या चित्रपट सृष्टीच्या 100 वर्षाच्या प्रवासाच्या स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित 57 व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलीवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांच्या चित्रपट सृष्टीच्या 100 वर्षाच्या प्रवासाच्या स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
* गायक व संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टच्या गीतांवर तरुणाई थिरकली*
पुणे -बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित 57 व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलीवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या ‘स्वरूप भाळवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट” या चित्रपट सृष्टीच्या 100 वर्षाच्या प्रवासाच्या जुन्या सदाबहार संगीताच्या सुरेल मैफलीच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या लाईव्ह इन कॉन्सर्ट मध्ये स्वरूप भाळवणकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या गीतांचे सादरीकरण केले. यावेळी बालगंधर्व कला परिवार ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते पार्श्वगायक स्वरूप भाळवणकर यांचा स्मृतीचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यावेळी म्हणाले कि बालगंधर्व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा एक आत्मिक आनंद मिळणारा क्षण होता.
स्वरूप भाळवणकर यांनी या कार्यक्रमात जे सादरीकरण केले, त्यामध्ये सिनेमाचा 100 वर्षाचा इतिहास होता.त्याची सुरुवात बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर व दिग्गजांनी गायलेले” शूर आम्ही वंदिले “यां गीताने केली. त्यानंतर के एल सहगल यांच्या बाबुल मोरा या गीताने 100 वर्षाचा चित्रपटाचा इतिहास व प्रवास त्यांनी 12 मिनिटात दाखविला. ज्यामध्ये 60 च्या दशका तील अभिनेते देवानंद, दिलीपकुमार, शम्मीकपूर यांच्यावर चित्रीत गाणी, 70 च्या दशकातील महानायक अमिताभ यांच्यावर चित्रित गाणी, 80 च्या दशकातील संगीतकार बप्पी लहरी यांचे “डिस्को डान्सर” हे गाणे, 90 च्या दशकातील मॅजिक शाहरुख खान, सलमान खान यांच्यावरील चित्रित गाणी, नुकतेच ऑस्कर मिळालेल्या आर आर आर चित्रपटातील नाचों नाचों हे गीत सादर केले.याचबरोबर एक नवीन गीत विठ्ठल नामात होवूनिया दंग आषाढी एकादशी निमित्त प्रदर्शित झाले तेही नृत्य कलाकारासह सादर केले.
या संगीत रजनीत खोया खोया चाँद,इना मीना डिका, तौबा तौबा, मेहंदी लगाके रखना हवा मे उडता जाये तेरा लाल दुपट्टा मलमल का, दिल चाहता है,प्रियतमा जवळ येना येना अशी एक से एक बढकर गीते नृत्य कलाकारांबरोबर गायक स्वरूप भाळवणकर यांनी सादर केली. स्वरूप भाळवणकर यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन गीते सादर केली.
गायक स्वरूप भाळवणकर यांचे लवकरच “पेरले तसेच उगवणार” हे गीत प्रदर्शित होणार आहे.या गीताचे महत्व असे आहे कि जसे कवयित्री बहिणाबाई चौधरी,गीतकार जगदीश खेबूडकर, गीतकार ग दि माडगूळकर, कवी व गीतकार मंगेश पाडगांवकर यांच्या लिखाणामध्ये जशी ताकद होती तशी पेरले तसेच उगवते महाराष्ट्राच्या म्हणी प्रमाणे “पेरले तसेंच उगवणार” या गीताचे लोकार्पण 10 जुलै 2025 ला होणार आहे. या गीतामध्ये पंजाबच्या लोकप्रिय अभिनेत्री गुरमित कौर मान या मराठीमध्ये प्रथमच अभिनय करणार आहे. या गीताद्वारे मराठी मध्ये त्या पदार्पण करत आहेत. ज्यामध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण असा अभिनय केला आहे. गुरमित कौर मान या पुण्यात राहत असून सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना पंजाबच्या लोकप्रिय अभिनेत्री गुरमित कौर मान यांनी येणाऱ्या नवीन गीताबद्दल उत्कंठा दर्शविली.
युवा प्रेक्षकांना गायक स्वरूप भाळवणकर यांनी गायलेल्या गीतांनी मंत्रमुग्ध केले. काही प्रेक्षकांनी तर नृत्याचा ठेका घेतला. स्वरूप भाळवणकर यांनी गायलेल्या गीतांवर प्रेक्षकांची त्यांनी वाहवा मिळविली. त्यांच्या संगीत रजनीने बालगंधर्व कला परिवाराच्या कार्यक्रमास चार चांद लावले.या कार्यक्रमास पुणेकर रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.